अनलॉक पाचमध्ये होणार चित्रपटगृह सुरु!

अनलॉक पाचमध्ये होणार चित्रपटगृह सुरु!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण देशाला जनु विळखाच घातला आहे. जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान, देशात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सुट दिली जात असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक पाच अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे.

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तेंव्हापासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारतर्फे चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती देता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून बंद असलेली चित्रपटगृह सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, चित्रपटगृहात केवळ 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे. चित्रपट पाहताना आसनव्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रेक्षकांना हँडवॉश किंवा हँड सॅनिटायझर पुरवण्यात याव असे देखील सांगण्यात आले आहे. प्रेक्षकांना आरोग्य सेतू ऍप वापरण्याचा सल्ला देण्यात यावा, तसेच थर्मल स्क्रिनिंग करून, केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाचा चित्रपटगृहांमध्ये प्रवेश देण्यात यावा असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *