बॉब बिस्वास चित्रपटातील अभिषेकचा लूक आला समोर

बॉब बिस्वास चित्रपटातील अभिषेकचा लूक आला समोर

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात 15 ऑक्टोबरपासून केंद्राने 50 टक्के प्रेक्षक संख्येसह इतर नियम अटी देऊन चित्रपटगृहे खुली केली आहे. अनलॉकिंग झाल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी चित्रिकरणांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे सगळे कलाकार आता बिझी झाले आहेत. एरवी लॉकडाऊन काळात घराघरांत बसलेले कालाकार आता काम सुरू झाल्यावर चित्रिकरणासाठी बाहेर पडले असून, याला अभिषेक बच्चनही अपवाद नाही. दरम्यान, बंगाली दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या बॉब बिस्वास या सिनेमातील अभिषेकचा लूक आता समोर आला आहे.

प्रख्यात बंगाली दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या बॉब बिस्वास या सिनेमात अभिषेक बच्चन मुख्य भूमिका साकारत असून, एका दिवसापूर्वीच अभिषेक बच्चनने चित्रिकरणात भाग घेतला. या सिनेमातला अभिषेकचा लूक आता समोर आला आहे. या नव्या लूकमध्ये अभिषेक बच्चनचे पूर्ण ट्रान्स्फॉर्मेशन झाल्याचे दिसते. या सिनेमाचे चित्रिकरण कोलकाता इथे सुरू झाले आहे. अभिषेक बच्चनसोबत या सिनेमात चित्रांगदा सिंगही झळकणार आहे. या दोघांचेही या सिनेमातले लूक्स समोर आले आहेत. अभिषेक बच्चन तर ओळखता येण्यापलीकडे आहे.

बॉब बिस्वास हा चित्रपट सुजॉय घोष या दिग्दर्शकाचा असून त्याने यापूर्वी कहानीसारखा चित्रपट दिला आहे. तर बॉब बिस्वास हा चित्रपट कहानी या चित्रपटाच्या पुढे जाणारी गुंतवून ठेवणारी गोष्ट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण खरंतर एप्रिल महिन्यात सुरू होणार होते. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले. आता जवळपास आठ महिन्यांच्या गॅपनंतर हे चित्रिकरण पुन्हा सुरू झाले असून, या सिनेमातील अभिषेक बच्चन चा लूक समोर आला आहे. यात अभिषेकने प्लेन ग्रे पॅंट परीधान केली आहे. तर निळ्या चौकड्यांचा शर्ट घातला आहे. शिवाय चष्माही आहे. लांबून बघता अभिषेकच्या चेहऱ्यावर उत्तम रंगभूषा केल्याचंही दिसतंय. तर त्याची हेअर स्टाईलही वेगळी आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub