मतदार हा कोणाचा गुलाम नाही : ओवेसी

मतदार हा कोणाचा गुलाम नाही : ओवेसी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. देशात सर्वांचे लक्ष हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले असतानाच बुधवार दि. 11 नोव्हेंबरच्या पहाटे 3 वाजता निकाल लागला. विधानसभेच्या 243 जागांपैकी एनडीएने या निवडणुकीत 122 जागांचा बहुमताचा जादूई आकडा पार करत बाजी मारली असली तरी या निवडणुकांमध्ये अनेक बदलही पाहालया मिळाले. बिहारमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवला.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचे आमचे डिपॉझिटही जप्त झाले होते. आमचा सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खुप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिले. जनतेने आम्हाला मतदान केले आणि प्रेम दिले. आम्हाला पुढे अजूनही मेहनत करायची आहे. दरम्यान, बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली.

ओवेसी पुढे म्हणाले की, आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीने तुरूंगात टाकले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे. निर्णयापूर्वी आम्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा करू. दरम्यान, बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार असे ओवेसी म्हणाले. आम्हाला भाजपाची टीम बी म्हटले जाते यावर देखील ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub