आयपीएल चौदामध्ये होणार मोठे बदल?

आयपीएल चौदामध्ये होणार मोठे बदल?

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे आयोजन युएईत केले होते. काही आठवड्यांपूर्वीच आयपीएलचा तेरावा हंगामा संपला असून, मुंबई इंडियंन्सने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 2021मध्ये होणारी आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याचे संकेत दिले होते. आयपीएलच्या 14व्या हंगामात बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निग काउन्सिल आणखी नवीन संघ सामिल करण्याच्या विचारात आहेत, तसेच काही मोठे नियम देखील लागू करू शकते.

कोरोनामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. त्याचबरोबर 2021मध्ये होणारी आयपीएल स्पर्धा भारतातच होणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संकेत दिले आहे. यावेळी मात्र आयपीएलमध्ये काही मोठे बदल होणार असून, या हंगामात 9 ते 10 संघ असण्याची शकतात आहे. तसेच आयपीएलच्या काही फ्रँचायझी प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंना संघात जागा देण्याच्या निर्णयाच्या बाजूने असून, आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलला अनौपचारिकरित्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 व्या परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची विनंती केली आहे.

आयपीएलच्या सध्याच्या नियमांनुसार संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चारपेक्षा जास्त परदेशी खेळाडूंना जागा देऊ शकत नाहीत. मात्र आता फ्रँचायझी प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 परदेशी खेळाडू ठेवण्याची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल व्यवस्थापन बहुधा स्पर्धेची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परदेशी खेळाडूंची संख्या 5 वर नेण्याची शक्यता आहे. अधिक विदेशी खेळाडू येण्यामुळे ही स्पर्धा अधिक स्पर्धात्मक व रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या हंगामात 9 ते 10 संघ असल्यामुळे देखील क्रिकेट प्रेमींना अधिक थरारक सामने पाहायला मिळतील.

दरम्यान, बिग बॅश लीगच्या धर्तीवर आयपीएलमध्येही एक बदल होऊ शकतो. बीबीएलच्या येत्या हंगामात ‘पॉवर सर्ज’ नियम लागू होणार आहे. पॉवर सर्ज म्हणजे दोन ओव्हरचा पॉवर प्ले. पॉवर सर्ज संघ शेवटच्या 10 षटकांमध्ये कधीही घेऊ शकता. यावेळी, 30 यार्डच्या बाहेर केवळ दोन क्षेत्ररक्षकांना परवानगी दिली जाईल.  तसेच बीबीएलच्या नवीन नियमांतर्गत संघांना सामन्यात दहाव्या षटकानंतर एक्स फॅक्टर खेळाडू वापरण्याची परवानगी दिली जाईल, ज्या एका फलंदाजाची किंवा एकापेक्षा जास्त षटके न टाकलेल्या क्षेत्ररक्षण संघातील गोलंदाजाची जागा घेतील, आयपीएल देखील बीबीएलचा हा नवा नियम यत्या आयपीएलच्या हंगामात अवलंबू शकतो.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub