उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश!

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत करणार प्रवेश!

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असून, जवळपास संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्यात आला आहे. दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असून, मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचे तिकीट देऊन रिंगणात उतरवले. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मते पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. आता मात्र राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली असून, आता त्या 1 डिसेंबर रोजी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub