वरूण आणि नताशाच्या लग्नासाठी नियम व अटी लागू!

वरूण आणि नताशाच्या लग्नासाठी नियम व अटी लागू!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात नियम आणि अटी देऊन चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. दरम्यान, मागील बऱ्याच काळापासून वरुण धवन आणि नताशा दलाल ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचे वळणही आले आहे. अवघ्या काही तासांमध्येच अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल विवाहबंधनात अडकणार असून, या विवाहसोहळ्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या रिलेशनशिपबाबत नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असून, आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, आपल्या विवाहसोहळ्यासाठी नताशा आणि वरुणने अथांग समुद्रकिनारा लाभलेल्या अलिबाग या ठिकाणी एका आलिशान बीच रिसॉर्टमध्ये बुक केले आहे. ज्यासाठी मोबाईल वापराबाबचे निर्बंध असणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही टीकून असल्यामुळे त्या धर्तीवर या विवाहसोहळ्यातही काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करण्यात आल्याचे दिसत आहे.

दोघांच्याही कुटुंबीयांकडून आमंत्रित करण्यात आलेली पाहुणे मंडळी विवाहस्थळी पोहोचली आहेत. पाहुणे आणि लग्नसोहळा अशा दोन गोष्टी एकत्र आल्या की फोटो, धम्माल आलीच. पण, वरुण आणि नताशा यांच्या लग्नसोहळ्यामध्ये मोबाईल वापरांबाबत काही निर्बंध आहेत. आपल्या जीवनातील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत यासाठी नताशाने विवाहस्थळी मोबाईल वापरास बंदीचा आग्रह धरला आहे. दरम्यान, विवाहस्थळ म्हणून निवड करण्यात आलेल्या रिस़ॉर्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या दिवसांत मोबाईल वापरता येणार नाही आहे.

वरुण आणि नताशा यांच्या लग्नसोहळ्यामधील मोबाईल वापरांबाबतचे निर्बंध हे सर्वच पाहुण्यांसाठी लागू आहे, की कुटुंबासाठी तो शिथिल करण्यात येईल हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, वरुण आणि नताशा दलाल यांच्या विवाहसोहळ्यासाठी येणाऱ्या कुटुंबीय आणि पाहुणे मंडळींना कोविड चाचणी करुनच या ठिकाणी प्रवेश देण्यात आला आहे. सर्वांनीच आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल वेडिंग प्लॅनर्सना देणे अपेक्षित होते. याशिवाय इथे मास्क आणि सॅनिटायझरची उपलब्धता असेल याचीही काळजी घेण्यात आली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub