वरूण धवन आणि नताशा दलाल अडकणार विवाहबंधनात!

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सिने इंडस्ट्रीला मोठा फटका लागला होता, आता मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असून, देशात नियम आणि अटी देऊन चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. दरम्यान, मागील बऱ्याच काळापासून वरुण धवन आणि नताशा दलाल ही जोडी रिलेशनशिपमध्ये आहे. आता त्यांच्या याच खास नात्यात लग्नाचे वळणही आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर वरूणचे काका अभिनेता अनिल धवन यांनी वरूण आणि नताशा रविवार दि. 24 जानेवारी 2021 रोजी लग्न करणार असल्याची माहिती दिली.
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या रिलेशनशिपबाबत नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मागील बऱ्याच काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असून, आता ते विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अभिनेता अनिल धवन म्हणाले, गेल्या कित्येक दिवसांपासून मी वरूणच्या मागे लागलो होतो. लवकर नताशाला धवन कुटुंबांची सून म्हणून घेऊन ये. अखेर वरुण लग्नाला तयार झाला असून, रविवार दि. 24 जानेवारीला हे दोघे अलिबाग येथे लग्नगाठ बांधणार आहेत. मी आणि माझे कुटुंब वरूणसाठी खूश आहोत.
वरुण आणि नताशा यांच्या लग्नासाठी अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलची बुकींग झाल्याचेही समोर आले आहे. खुद्द वरुण धवन यानेच लग्नासाठीच्या या ठिकाणाची पाहणी केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या विवाहसोहळ्यासाठी 200 पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अॅडव्हान्स बुकींगपासूनचे सर्व व्यवहारही पूर्ण झाले आहेत. दरम्यान, नताशा आणि वरुण मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्येच ते विवाहबंधनात अडकले जाणार होते. पण, कोरोनाच्या संकटामुळे हे शक्य होऊ शकले नाही. पण, आता मात्र खऱ्या अर्थाने ही जोडी नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात सज्ज झाली असून, येत्या 24 जानेवारी रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.