डॉक्टर तेच इंजेक्शन लिहून का देतात? : सोनू सूद

डॉक्टर तेच इंजेक्शन लिहून का देतात? : सोनू सूद

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन तसेच कोरोना लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवत असून, इंजेक्शनसाठीही नातवाईकांची धावपळ होत आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसीवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत असून, डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून देण्यात येत आहे. मात्र, बाजारात ते इंजेक्शनच उपलब्ध होत नसल्यामुळे अभिनेता सोनू सूद याने साधा आणि सरळ प्रश्न विचारला आहे.

देशात कोरोना संकाटाचा सामना करताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत आहे. कोरोना काळात रुग्णांची मोठी गैरसोय होताना दिसत असून बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनसाठीही नातवाईकांची धावपळ होत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमेडेसीवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून देण्यात येत आहे. मात्र, जर प्रत्येकाला माहिती आहे, की एखादे इंजेक्शन बाजारात उपलब्धच होत नाही. मग, प्रत्येक डॉक्टर केवळ तेच इंजेक्शनची मागणी का करतात, तेच इंजेक्शन का लिहून दिले जात आहे, असा सवाल अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे.

सोनू सूदने पुढे म्हटले आहे की, जर रुग्णालयाला ते इंजेक्शन मिळत नसेल, तर सर्वसामान्य माणसांना कसे मिळेल. त्या इंजेक्शनला पर्यायी मेडिसीन का उपलब्ध होत नाही, ज्यामुळे लोकांचे प्राण वाचतील. दरम्यान, कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन लिहून देण्यात येते. मात्र, बाजारात ते इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यातच, इंजेक्शनची मागणी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात काळाबाजारही झाल्याचे पाहायला मिळाले. 2 इंजेक्शन तब्बल 70 हजार रुपयांना विक्री केल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub