यास वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही!

यास वादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नाही!

पुणे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने राज्याच्या सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत थैमान घातले. यात वादळामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एक नविन वादळ राज्याला धडकणार असून, याचे नाव ‘यास’ असे आहे. या चक्रीवादळाची तीव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा जास्त असणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे, तर 15 जूनपर्यंत मुंबईतही मान्सून दाखल होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाला सुरुवात होण्यासाठी 20 ते 25 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यातच यास चक्रीवादळाचे संकट राज्यासमोर असून, या चक्रीवादळाची तीव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा जास्त असणार आहे. असे असले तरी मात्र, यास चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीही गरज नसल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

देशात अजूनही किमान 40 टक्के शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा स्थितीत यास चक्रीवादळामुळे मान्सून वेळेवर येणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली होती. मात्र हवामान विभाग शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीही गरज नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत म्हणजेच 31 मे रोजी केरळात नैऋत्य मोसमी वारे दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पण केरळनंतर इतर राज्यात कधी मान्सून दाखल होईल? याबाबत हवामान खात्याकडून अद्याप कोणती माहिती देण्यात आली नाही. पण केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणत: 10 ते 15 दिवसांत महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub