धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

अहमदाबाद : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे.

कच्छ पोलीस अधीक्षक सौरभ सिंह म्हणाले, काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या अश्‍लील धमकीसंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्याला रविवारी गुजरातमधील मुंद्रा येथे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ यांनी पुढे सांगितले की, रांची पोलिसांनी या मुलाबद्दची माहिती कच्छ (पश्चिम) पोलिसांसोबत शेअर केली असून त्याने धमकी देणारे मेसेज पोस्ट केले आहेत की नाही याची सत्यता पडताळण्यास सांगितले आहे.

आयपीएलच्या मैदानात कोलकात्याविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत विचित्र प्रकार घडला. एका ट्रोलरने थेट धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करत त्याच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केला होता. तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्रोलर्सच्या या विकृत मानसिकतेकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub