काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी

काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे काश्मीरचा मुद्दा आहे. दरम्यान, कलम 370 च्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. अब्दुल्ला पितापुत्र आणि मेहबुबा मुफ्ती हे काश्मीरच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रु आहेत, आता मात्र 370 परत करा या मुद्द्यावर त्यांची एकी झाली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरचे सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले असून, गुपकार ठराव 2 या नावाखाली या पक्षांनी काश्मीरसंदर्भातल्या आपल्या मागण्या मांडल्या आहेत. ज्यात कलम 370 हे पुन्हा बहाल करुन काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा परत मिळावा, ‘35ए’ अंतर्गत संपत्तीचे अधिकार कायम राहावेत अशा मागण्या करण्यात आल्या असून, या गुपकार घोषणापत्रासाठी अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या दोन कट्टर शत्रुंची हातमिळवणी झाली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरमधील कलम 370 रद्द केली. त्याच्या एक दिवस आधी 4 ऑगस्टला हे सगळे पक्ष गुपकार ठरावासाठीच एकत्र आले होते. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेले सात आठ महिने हे सगळे नेते बंदिस्त होते. आता मात्र कलम 370 वरुन पुन्हा राजकारण सुरु होत असून, कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागली केली जात आहे. त्यामुळे आता या राजकीय पक्षांच्या आंदोलनावरुन पुढे कसे राजकारण पेटते आणि त्यावर केंद्र सरकारची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub