आघाडी सरकारकडून सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी होणार!

आघाडी सरकारकडून सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी होणार!

मुंबई (प्रतिनिधी) : नव्या कृषी विधेयकांवरुन देशभरात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमलेले आहेत. शेतकरी आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, आता परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. दरम्यान, दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केले आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर भारतातील अनेक खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असे आवाहन केले होते. आता मात्र, आघाडी सरकारकडून सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी केली जाणार आहे.

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता मात्र, देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून, यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्यावर भारतातील अनेक खेळाडू तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असे आवाहन केले होते. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचे ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसेच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचे सांगण्यात आले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub