उमरा ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडी भिडली आपसात!

उमरा ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडी भिडली आपसात!

परभणी (प्रतिनिध) : सध्या संपूर्ण जिल्हा हा कोरोना महामारीशी झूंज देत असून, त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. आता मात्र, परिस्थिती पूर्वपदावर येत असून, लसीकरणाला देखील सूरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेतेमंडळींना धक्के देणारे निकाल लागले आहेत. काही दिग्गज नेत्यांनी मात्र आपले गड राखण्यात यश मिळवले असल्याचे दिसून येत असून, अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पाथरी तालुक्यात तर उमरा ग्रामपंचायतीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपसात भिडले होते.

परभणी जिल्ह्यातील 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 68 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. तर 15 जानेवारी रोजी 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यानंतर सोमवार दि. 18 जानेवारी रोजी मतमोजणीला झाली असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. पाथरी तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतमध्ये तर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपसात भिडले होते. मात्र, लागलेल्या निकालानंतर येथील चित्र स्पष्ट झाले असून, मतदारांनी तीनही पक्षाला बहुमतापासून दूर ठेवले आहे.

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी मतदान घेण्यात आले. येथे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली. राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीच एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपसात भिडत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे येथील निकालाकडे लक्ष लागले होते. तीनही पक्षाने ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी जोर लावला होता. मात्र, सोमवारी सकाळी लागलेल्या निकालात मतदारांनी तीनही पक्षाला बहुमतापासून दूर ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 3 आणि काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub