दिल्ली कॅपिटल्सचा संघ मोठ्या संकटात

दिल्ली कॅपिटल्सचा संघ मोठ्या संकटात

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलला 19 सप्टेंबर पासून सूरूवात झाली आहे. आयपीएलचा घमासान सुरू झाल्यापासून क्रिकेट प्रेमींना एकामागून एक थरारक सामने पाहायला मिळत आहे. त्यातच आज दि. 17 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांना आयपीएलचा डबलडोस मिळणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामात शनिवार दूपारच्या सत्रात राजस्थानचा बँगलोर सोबत सामना आहे तर रात्रीच्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. परंतु, या सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा संघ मोठ्या संकटात सापडला आहे.

अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये दिल्लीच्या संघाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून, स्टार फलंदाज रिषभ पंत दुखापतीमुळे चेन्नई विरूद्धच्या सामन्यात संघाबाहेर राहणार आहे. याच कारणामुळे गेल्या सामन्यामध्ये देखील रिषभ पंत खेळू शकला नव्हता. रिषभ पंत संघात वापसी कधी करणार, यासंदर्भात दिल्ली कॅफिटल्सच्या वतीने आतापर्यंत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. रिषभ पंत ऐवजी सध्या संघात एलेक्स कॅरी विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळताना दिसत आहे. तसेच सध्या अजिंक्य रहाणेलाही संघात स्थान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीच्या संघातील अनेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. अमित मिश्रा आणि ईशांत शर्मा आधीपासूनच दुखापतीमुळे 13व्या सीझनमधून बाहेर गेले आहेत. त्यातच आता रिषभ पंत देखील दुखापतीमुळे संघाबाहेर राहणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी आणखी एक मोठी समस्या म्हणजे, कर्णधार श्रेयस अय्यरला झालेली दुखापत आहे. गेल्या सामन्यात अय्यरच्या खांद्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. श्रेयस अय्यर देखील चेन्नई विरूध्दच्या सामन्यात सहभाग घेणार नाही. त्यामुळे शिखर धवन आजच्या सामन्यात संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub