सहा शहरात होणार आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन!

सहा शहरात होणार आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईत केले होते. आयपीएलचा तेरावा हंगामा जिंकून मुंबई इंडियंन्सने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दरम्यान, या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या सहा शहरांची निवड केली आहे. या शहरांच्या निवडीचा फटका मात्र स्पर्धेतील तीन संघांना बसणार आहे.

बीसीसीआयने आयपीएल सामन्यांच्या आयोजनासाठी ज्या शहरांची निवड केली आहे. त्यापैकी अहमदाबाद हे एकमेव असे शहर आहे ज्याचा कोणताही संघ नाही. अन्य पाच शहराचे संघ आहेत. जे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळू शकतली. मात्र, राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या शहरांना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. दरम्यान, यावर्षी आयपीएल स्पर्धा ही आठ ऐवजी सहा शहरातून होणार आहे. हैदराबाद संघाला देशांतर्गत क्रिकेटमुळे मैदान मिळाले नाही, तर दिल्लीचा समावेश अखेरच्या टप्प्यात करण्यात आला.

बीसीसीआयने आयपीएल चौदासाठी मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या सहा शहरांची निवड केल्याने राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला असता असे त्यांचे मत आहे. त्यातच मात्र, महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे. तरी देखील वानखेडे स्टेडिअमवर सामने भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील सामने हे प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहेत. दरम्यान, यंदाचे आयपीएल सामने पाहण्यासाठी काही राज्यात प्रेक्षकांना स्टेडियमवर जाता येणार नाही. तर काही राज्यात 50 टक्के प्रेक्षक उपस्थित राहू शकणार आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub