आयपीएल मध्ये राजस्थान आणि कोलकाता आमने-सामने!

नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलला 19 सप्टेंबर पासून सूरूवात झाली आहे. आयपीएलचा घमासान सुरू होताच क्रिकेट प्रेमींना एकामागून एक थरारक सामने पाहायला मिळत आहे. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या दोन्ही विजयांत द्विशतकी धावसंख्या उभारणाऱ्या राजस्थान रॉयल्सची विजयी घोडदौड रोखण्यासाठी बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीझनमधील बारावा सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या दरम्यान होणार आहे. आयपीएलच्या हंगामाला प्रारंभ होण्यापूर्वी माफक अपेक्षा करण्यात आलेल्या राजस्थानने प्रत्यक्षात मात्र वादळी कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला अस्मान दाखवल्यानंतर मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 224 धावसंख्येचे लक्ष्यही त्यांनी एक ओव्हर राखून मिळवले.
राजस्थानच्या अवघड आव्हानाला सामोरे जाताना कोलकाता नाइट रायडर्सची प्रमुख मदार आंद्रे रसेल आणि विश्वविजेता इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यावर आहे. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत मर्यादित संधी मिळाली आहे. गतवर्षीच्या हंगामातील सर्वाधिक 510 धावा करणाऱ्या रसेलला फलंदाजीत वरचा क्रमांक देण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, बुधवारच्या सामन्यात कोलकाताच्या संघाला राजस्थानची विजयी घोडदौड रोखण्यासाठी पराकाष्ठा करावी लागणार आहे.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.