75 रूपयांचे नाणे जारी

75 रूपयांचे नाणे जारी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण देश हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान, अन्न व कृषी संघटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी 75 रुपयांचे स्मृती नाणे जारी केले. त्याशिवाय त्यांनी नुकत्याच विकसित केलेल्या 8 पिकांच्या 17 जैव संवर्धित बियाणांचे लोकार्पण देखील केले.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, अन्न व कृषी संघटनेचा 75 वा वर्धापन दिन विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे. या 75 वर्षांमध्ये एफएओने भारतासहित संपूर्ण जगभरात कृषी उत्पादन वाढवले, गरिबी हटवण्यात एफएओची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकारकडून जारी करण्यात आलेले 75 रुपयांचे स्मृती नाणे एफएओचा देशाच्या 130 कोटी जनतेकडून करण्यात आलेला सन्मान आहे.

देश आणि जगभरातून कुपोषण नष्ट करणे हे आमचे ध्येय असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. नवीन कृषी कायद्याबाबत भाष्य करताना ते म्हणाले की, या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एमएसपी जारी राहिल. या कार्यक्रमात अंगणवाडी, कृषी विज्ञान केंद्रे आणि देशभरातील सेंद्रिय आणि फलोत्पादन मोहिमेशी संबंधित लोक सहभागी झाले होते. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणीही या कार्यक्रमात उपस्थित होत्या.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *