राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे खुली!

राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे खुली!

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या असून, तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे सोमवार दि. 16 नोव्हेंबर पासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे पाडव्यापासून उघडणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिवाळाची भेट दिली असून, तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे सोमवार दि. 16 नोव्हेंबर पासून खुली झाली आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सर्वांनीच स्वागत केले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश मंदिरे पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरे तसेच सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, राज्यातील धार्मिक स्थळांना टाळे कायम होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरे उघडण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती, परंतु योग्यवेळी धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी देऊ असे सरकारकडून सांगण्यात येत होते. अखेर राज्य सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले असून, सोमवार दि. 16 नोव्हेंबर पासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळे खुली झाली आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub