जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न!

जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, शहरातील विविध भागातील विकास कामांसाठी निधी आणला जात असून, जुना पेडगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रविवार दि. 20 जून रोजी करण्यात आला आहे. दिल्याबद्दल नागरिकांच्यावतीने आ.डॉ. राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

शहरातील जुना पेडगाव रस्त्याच्या कामासाठी 4 कोटी 11 लाख रुपयांचा निधी आ.डॉ. राहुल पाटील यांनी मूलभूत सुविधा ठोस निधीअंतर्गत उपलब्ध करून दिला. या निधीतून रस्त्याचे काम होत आहे. रविवार दि. 20 जून रोजी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, उर्वरित भागातही निधी आणून शहराचा विकास करणार असल्याचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले. जुना पेडगाव रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांच्यावतीने आ.डॉ. राहुल पाटील यांचा सत्कार केला जात आहे.

दरम्यान, भूमिपूजन कार्यक्रमास खा. बंडू जाधव, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपुडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, गटनेते जाकेर लाला, डॉ. विवेक नावंदर, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर, अतुल सरोदे, प्रशास ठाकूर, नंदू पाटील, राजू कापसे, बाळासाहेब बुलबुले, संजय खिल्लारे, बाळासाहेब दुधगावकर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, मनोज पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, सुशील कांबळे, विवेक कलमे, अर्जुन सामाले, संजय गडग, मोबीन काजी आदींची उपस्थिती होती.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub