जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू थांबेनात!

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू थांबेनात!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवार दि. 21 जून रोजी 21 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता बऱ्यापैकी कमी झाला असला तरी रुग्णांचे मृत्यू मात्र थांबत नसल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, सोमवार दि. 21 जून रोजी आरोग्य विभागाला 1 हजार 902 नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या 1 हजार 717 अहवालांमध्ये 18 रूग्ण आणि रॅपिड टेस्टच्या 285 अहवालांमध्ये तिघांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. असे असले तरी मृत्यू मात्र थांबलेले नूसन, जिल्ह्यात सोमवारी एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्हा सामान्य रुग्णालय, आयटीआय हॉस्पिटल आणि एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण मृत्यू पावला आहे. मृत्यू पावलेल्या तीन रुग्णांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 26 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्यामुळे सोमवारी या रुग्णांना कोरोनामुक्त जाहीर करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असला, तरी बाधित रुग्णांचे मृत्यू मात्र थांबलेले नाहीत. दरम्यान, सध्यस्थितीला जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजार 629 झाली असून, त्यापैकी 49 हजार 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 277 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे 260 रुग्ण उपचार घेत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub