पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू

पाथरी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. आता मात्र राज्यात तथा परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमिवर शहरात जिल्हा रुग्णालयासह विविध भागात सुरू केलेले कोविड केअर सेंटर देखील बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथून मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्राच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे शनिवारी सायंकाळी माजलगाव-तेलगाव रस्त्यावर साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलने जात असलेल्या पिता-पुत्राच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत मरडसगाव येथील हरिभाऊ गीताराम काळे (वय 35 वर्षे) आणि त्यांचे वडील गीताराम काळे (वय 55) या दोघांचा मृत्यु झाला. ते मोटारसायकलने धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील नातेवाईकांकडे जात होते.

माजलगाव-तेलगाव रस्त्यावर असलेल्या शिंदेवाडी फाट्याजवळ पाठीमागून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात हरिभाऊ काळे जागीच ठार झाले. त्यांचे वडील गीताराम काळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलविले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरला उपचारासाठी नेले जात असताना त्यांचा देखील मृत्यू झाला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub