मराठा आरक्षणावर 27 ऑक्टोबरला होणार सुनावणी

मराठा आरक्षणावर 27 ऑक्टोबरला होणार सुनावणी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना राज्यातील मराठा समाजाला मोठा धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिली, याविरूध्द मराठा समाज आक्रमक झाले आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी मराठा समाजाकडून अनेक अंदोलने करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या मराठा आरक्षण खटल्यात सुप्रीम कोर्टातील पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी आहे. 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य करतानाच आरक्षणाला स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला. त्यानंतर राज्यात या मुद्द्यावरून राजकीय वादळ उठले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि या प्रकरणातले याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण तातडीने पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागावे आणि आरक्षणावरची स्थगिती उठवावी या मागणीसाठी अर्ज केला.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाले असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत मागच्या सुनावणीत हे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे द्यायची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती. मात्र तरीही हे प्रकरण सध्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे लागलेले आहे. आता या खटल्यात 27 तारखेला नेमके काय होते? स्थगिती उठवण्याबाबत काही निर्णय होतो का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *