कोहलीचा संदेश त्यालाच पडला भारी

कोहलीचा संदेश त्यालाच पडला भारी

नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलचे आयोजन युएईत केले होते. आता मात्र आयपीएल संपले असून, 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. कोरोना साथीच्या काळात हा भारतीय संघाचा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहली यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, कोहलीने दिवाळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच त्यांनी चाहत्यांना फटाके न फोडण्याचा संदेश दिला होता.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ युएईवरून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून, कोहलीने ऑस्ट्रेलियातूनच एक व्हिडीओ शेअर करीत फॅन्सला दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच त्याने चाहत्यांना प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके न फोडण्यासाठी अपील केली होती. परंतु या मेसेजवर अनेक चाहते संतप्त झाले आहेत आणि त्यांनी कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही ट्रोलिंगला सुरुवात केली.

दरम्यान, ट्विटरवर कोहलीच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, जो त्याने या महिन्याच्या सुरुवातीला दुबईमध्ये आपल्या टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर साजरा केला होता. कोहलीच्या वाढदिवसाचा हा व्हिडिओ आरसीबीने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये कोहली अनुष्कासोबत केक  कापण्यापूर्वी पहिल्यांदा बॅकग्राऊंडवर फटाके फोडताना दिसत आहे. ट्रोलर्सने हा व्हिडीओ कोहलीच्या दिवाळी संदेशाच्या व्हिडीओसह जोडून खूप ट्रोल केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub