परभणीत दसऱ्याच्या दिवशी मद्यविक्री बंद

परभणीत दसऱ्याच्या दिवशी मद्यविक्री बंद

परभणी (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, राज्यात कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे संकंट असल्यामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी मद्यविक्री बंद राहणार आहे.

उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दसऱ्याच्या दिवशी दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-3 देशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती, एफएल-2 सीएल, एफएल, टिओडी-3, देशी व विदेशी दारु किरकोळ विक्री अनुज्ञप्ती. एफएल-3 परवाना कक्ष व एफएल,बीआर-2, बिअरची सिल बंद बाटलीतून विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारका विरुध्द कडक कारवाई करण्यात येणार आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *