लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज

लसीकरणाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये गैरसमज

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. परंतु लसीकरणाचे वेगळे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. आजही अनेक ठिकाणी लसीकरणावरून नागरिकांत अज्ञान, समज गैरसमज मोठ्या प्रमाणात असल्याचेच त्यांच्या वर्तनावरून समोर येत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या वाढत्या कोरोनाला पायबंद घालण्यासाठी लसीकरण आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. एकीकडे राज्यातील मोठ्या शहरात लसीकरणासाठी रांगा लागत आहेत, तर तालुक्यांच्या ठिकाणी लसीकरण सुरू करायला 10 व्यक्ती जुळण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते, असे चित्र आहे. तालुकांच्या ठिकाणी आरोग्य विभागाला लसीकरण केंद्रावर नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने गावागावात शिबिर लावून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे.

आरोग्य विभागाकडून शक्य ते सर्व उपाय करण्यात येत आहेत परंतु अनेक गावात नागरिक अजूनही लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लसीकरणासाठी शिबिर लावलेली असताना देखील गावातील नागरिक लसीकरण करण्याला विरोध करीत आहेत. ही परिस्थिती संपूर्ण राज्यातील तालुक्यांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे हतबल झालेल्या आरोग्य विभागाकडून समाजातील काही घटकांनी व तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजात जनजागृती करण्यासाठी पुढे येऊन लसीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन केले जात आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub