परभणीतील 17 वॉटर प्लांटला महापालिकेचा सील

परभणीतील 17 वॉटर प्लांटला महापालिकेचा सील

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, त्यामुळे परिस्थिती खुप गंभीर झाली होती. आता मात्र राज्यात तथा परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घसरण पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमिवर शहरात जिल्हा रुग्णालयासह विविध भागात सुरू केलेले कोविड केअर सेंटर देखील बंद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील परवानगी नसलेल्या जारच्या पाण्याच्या व्यवसायावर न्यायालयाच्या आदेशानुसार शहर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, गुरुवार दि. 19 नोव्हेंबर रोजी 17 वॉटर प्लांटला सील ठोकण्यात आले आहे.

परभणी शहर महापालिका हद्दीत पाणी शुध्दीकरण करण्याचा अवैध व्यवसाय चालवला जात होता. शहरातील नागरीकांना पिण्यासाठी पुरविण्यात येणारे पाणी विना तपासणी करुन पुरवल्या जात असल्याचे महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाने एका पत्राद्वारे महापालिकेला कळविले होते. जार व्यवसायिक हे कोणताही परवाना, केंद्रीय भुजल प्राधिकरणाचे प्रमाणपत्र न घेता तसेच अन्न आणि औषण प्रशासनाच्या प्रमाणपत्राविना अवैध रित्या व्यवसाय करीत होते. सदर व्यवसायीकांना महापालिकेने नोटिस बजावुन त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. ज्या व्यवसायिकांनी कागदपत्र सादर केली नाही. त्यांच्यांवर सीलिंगची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

शहरात जारच्या पाण्याचा अवैध गोरखधंदा जोमाने सुरु होता. परवानगी नसलेल्या या व्यवसायावर न्यायालयाच्या आदेशानुसार शहर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून, प्रभाग समिती ब अंतर्गत सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 12 आणि 16 मधील 15 वॉटर प्लांटवर कारवाई करत प्लांट सिल करण्यात आले आहेत. तसेच प्रभाग समिती अ अंतर्गत सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वॉटर प्लांटला सिल लावण्यात आले. तर 7 वॉटर प्लांट चालकांनी स्वत:हुन त्यांचे सामान व्यवसायाच्या ठिकाणाहुन हलविले असल्याचे समोर आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub