बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज येणार निकाल?

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी आज येणार निकाल?

अयोध्या : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली आहे. यातच अयोध्येतील राम जन्मभूमीचा खटला निकाली निघाला. राम लल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन देखील झाले आहे. मात्र, 1992 साली बाबरी मशिद घटने प्रकारणातील मुख्य आरोपींवर अंतिम निकाल आज दि. 30 सप्टेंबर रोजी येणे अपेक्षित आहे. दरम्यान, 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला अंतिम टप्प्यात आहे.

बाबरी मशिद घटनेच्या ह्या 28 वर्षात काय काय घडले याचा लेखाजोखा लखनौच्या विशेष न्यायालयात सूरू आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारच्या पहिला शिलान्यास सोहळा ते 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले. ह्या दरम्यान अनेक रंजक घडामोडी घडल्या असून, देशातील एका मोठ्या समुदायास या निकालाची प्रतिक्षा आहे.

उत्तर प्रदेशच्या अयोध्या मधील बाबरी मशिदीची निर्मिती मोगल बादशहा बाबरचा जनरल मीर बाकी यांनी केली होती, अनेक ऐतिहासिक दस्तांवेजांनुसार ही मशिद रामाचे जन्म स्थळ असलेल्या मंदिरा वरच बांधली गेली होती. ज्या बद्दल सर्वोच्च न्यायालयाने यावर्षीच निवाडा दिला आहे. राम मंदिरासंदर्भात निकाल देताना मशिद बेकायदेशीरपणे तोडली गेली असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र आज 30 सप्टेंबर रोजी बाबरी मशिद कुणी पाडली? ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास मिळेल असा विश्वास आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.