‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु

‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु

पूणे (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. मात्र, कोरोनाचा कहर वाढतच आहे, आकडे देखील वाढत आहेत. दरम्यान, ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे.

पुण्यातल्या ससून रुग्णालयात ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली असून, सिरम इन्स्टि्टयूट या लशीची निर्मिती करणार आहे. तसेच स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत 43 स्वयंसेवकांची निवड केली आहे. त्यातील 12 जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

जगभरात तसेच देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभर मोठया प्रमाणावर लस संशोधन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारासंदर्भात माहिती देणारी एक वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर कोरोना व्हायरसवर झालेल्या संशोधनाचा डाटा, भारतातील संभाव्या लशींच्या क्लिनिक चाचण्यांची माहिती उपलब्ध असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.