जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात घसरण

जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात घसरण

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक न करता अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करत असल्यांचे दिसत आहेत. याचाच परिणाम सध्या देशातील सोन्याचे दर जवळपास 50 हजारापर्यंत आले आहेत.

मागील काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता दिसून आली आहे. त्यातच येणारा ऑक्टोबर महिना भारतात मोठ्या प्रमाणात सणासुदींचा आहे, त्या काळात सोन्याचे दर वाढण्याची दाट शकतात आहे. त्यामुळे सोने आत्ताच खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहचल्या होत्या. एका दिवसाच्या वाढीनंतर सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत.

जागतिक बाजारपेठेत देखील सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मागील महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याचे वायदे बाजारातील दर सर्वोच्च पातळीवर गेले होते. सोन्याच्या किंमती विक्रमी 56 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचल्या होत्या. मागील आठवड्यातील शुक्रवारपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम 49 हजार रुपयांच्या किमान पातळीवर पोहोचले होते. म्हणजे जवळपास एका महिन्याच्या आत सोन्याचे दर 6 हजार 820 रुपयांनी घसरले होते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published.