सेलू-पाथरी रस्त्यावर खड्डेच खड्डे

सेलू-पाथरी रस्त्यावर खड्डेच खड्डे

सेलू (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण राज्याला जनु विळखाच घातला असून, जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण जिल्हा हतबल झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात असून, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, महाराष्ट्र सरकार व रेल्वे मंत्रालय यांच्या वतिने होत असलेल्या सेलू शहरालगत पाथरी रस्त्यावर रेल्वे गेट क्रमांक 99 वरिल रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम गेल्या दिड वर्षापासून रखडले असून सेलू-पाथरी रस्त्यावरही खड्डेच खड्डे झाले असल्याने वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व सरकारी तथा खाजगी कामे ठप्प झाली होती, आता मात्र परिस्थिती सूधारत असून, अनेक कामे सूरळी झाली आहे. दरम्यान, साईबाबा यांची जन्मभूमी पाथरी व सदगुरू बाबासाहेब महाराज यांची भुमी सेलू या 24 किलोमिटर अंतराचा रस्ता मागील अनेक वर्षापासून खड्डेमय झाला आहे. संबधित विभागाकडून प्रत्येक वर्षी या रस्त्यावरिल खड्डे बुजविण्यासाठी शासनाचा कोट्यावधी रूपयांचा खर्च होत आहे. तरी देखील या रस्त्यावरिल खड्डे कामयच आहेत. अनेक वर्षे पाथरीवरून येणारे वाहण चालक पाथरीवरून मानवत रोड मार्गे ये-जा करीत आहेत.

राज्य रस्ता क्रमांक 221 सेलू ते पाथरी रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे वर्ग झाला आहे. याला राष्ट्रीय महामार्ग ‘548बी’ हा क्रमांक मिळाला आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी सहा कोटी रूपये खर्च करून सेलू-पाथरी रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण करण्यात येणार होते. तसेच मागील अनेक वर्षापासून सतत मागणी होत असलेल्या सेलूहून पाथरीकडे जाणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगवरिल उड्डाण पूलाचे काम देखील दिड वर्षात पूर्ण होणार होते. परंतू त्या ठिकाणी संबंधित एजन्सीने केवळ खोदकाम करून लोंखडी पत्राचे ले-आऊट लावूण वाहन धारकांना अडचण निर्माण केली आहे. या रस्त्यावरिल खड्यांमुळे अनेकांना मणकांचा त्रास तर अनेकांच्या हात-पायांना फॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub