जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्यांपेक्षाही कमी!

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्यांपेक्षाही कमी!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यास सूरूवात झाली असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरूवार दि. 10 जून रोजी 26 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाणही घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गुरूवार दि. 10 जून रोजी आरोग्य विभागाला 3 हजार 549 नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या 2 हजार 747 अहवालांमध्ये 16 रूग्ण आणि रॅपिड टेस्टच्या 802 अहवालांमध्ये 10 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यात गुरूवारी एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्हा रुग्णालयात 1 रुग्ण आणि खाजगी रूग्णालयात एक असे एकूण दोन रूग्ण मृत्यू पावले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 88 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्यामुळे गुरूवारी या रुग्णांना कोरोनामुक्त जाहीर करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 0.77 टक्के नोंद झाला असला, तरी बाधित रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील संतगतीने वाढत आहे. दरम्यान, सध्यस्थितीला जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 50 हजार 340 झाली असून, त्यापैकी 48 हजार 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 256 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे 890 रुग्ण उपचार घेत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub